बालाजी विश्वविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दिले अध्यात्माचे धडे

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी विश्वविद्यालयांमध्ये नेहमीच सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना शारीरिक, अध्यात्मिक, बौद्धिक सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाते .त्याचाच प्रत्यय म्हणून दि. 26 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमीनिमित्त विद्यालयांमध्ये ह.भ प. हरीदास बोऱ्हाडे यांचे सृश्राव्य प्रवचन झाले. त्यावेळी त्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना गोष्ट रूपाने माहिती दिली. तसेच विद्यालयातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण विषयीच्या गवळणी सादर केल्या.
विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून काल्याच्या प्रसादाचा आस्वाद घेतला. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर यांनी हरिदास बोऱ्हाडे महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.तसेच विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री काळुराम पाबळे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले व कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला.

Scroll to Top