बालाजी विश्वविद्यालयामध्ये राष्ट्रीय अंतरिक्ष दिन उत्साहात साजरा
शिरूर: बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी विश्वविद्यालयामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. तिथीनुसार जयंती, पुण्यतिथी, सण समारंभ, विशेष दिन साजरे केले जातात .
विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात .तसेच त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते .
23 ऑगस्ट 2023 रोजी भारताने यशस्वी केलेल्या चांद्रयान- ३ ला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतरिक्ष दिन सर्व भारतभर साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने बालाजी विश्वविद्यालयांमध्ये देखील राष्ट्रीय अंतरिक्ष दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी विश्वविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विनायक म्हसवडे होते. माननीय अध्यक्षांच्या हस्ते सरस्वती पूजन व सी .वी .रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील चांद्रयान-३ विषयी माहिती दिली .विद्यार्थ्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवून चंद्रयान-३ संदर्भात मॉडेल्स बनवले ,ड्रॉइंग काढल्या. तसेच मा.अध्यक्षांनी देखील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाळगावा याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर विद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या स्पर्धेत यश मिळवले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ .जयश्री वाव्हळ यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक शैला चौरे, रेश्मा घार्गे ,संदीप जामदार, विज्ञान शिक्षिका शितल घनगावकर ,मयुरी शिराढोणकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार उपमुख्याध्यापिका सौ.स्वाती चत्तर यांनी मांडले. व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.