बालाजी विश्व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये 78 वा स्वातंत्र्य महोत्सव आनंदात साजरा
शिरूर: बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएससी ),बालाजी विश्वविद्यालय( सेमी इंग्लिश) या विद्यालयांमध्ये 78 वा. स्वातंत्र्य महोत्सव उत्साहात पार पडला.
सर्वप्रथम मान्यवरांचे लेझीम व ढोल ताशांच्या गजरा स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री .सदाशिव आण्णा पवार , प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्नल रतनसिंह नायकवडे, प्रमुख उपस्थिती सुभेदार सुरेश उमाप, सुभेदार बी. एस. पवार ,सुभेदार शहाजी पवार ,कॅप्टन जयवंत कटके ,हवालदार भास्कर चव्हाण ,बालाजी विश्व विद्यालयाचे प्राचार्य विनायक म्हसवडे, बालाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, रामलिंगचे सरपंच विठ्ठलराव घावटे ग्रामपंचायत सदस्य सागर घावटे ,सरपंच शिल्पाताई ,उपसरपंच बाबाजी वर्पे, आदर्श सरपंच अरुणराव घावटे, ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे ,संदीप गावडे, दिनकर साबळे, सनी भैया जाधव, संदीप घावटे, स्वातीताई घावटे,दत्तात्रय कापरे, सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या समवेत ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास द्वारे ध्वजाला मानवंदना दिली. संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशावरील प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले. देशभक्तीपर गीते विद्यार्थ्यांनी गायली. बालाजी विद्यालयातील विद्यार्थी नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात तसेच स्पर्धा परीक्षा मंथन प्रज्ञाशोध परीक्षा ,स्कॉलरशिप परीक्षा व इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना विशिष्ट रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना देखील विशिष्ट रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . यावेळी व्यंकटेश बँकेकडून देखील इयत्ता दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. दोन्ही विद्यालयातील प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यालया विषयीची माहिती सविस्तर मांडली. प्रमुख पाहुण्याने देखील आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना देशभक्ती धडे दिले .अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेच्या अध्यक्षांनी पुढील वर्षी अधिक अधिक विद्यार्थी बक्षिसे मिळतील आणि विद्यालयाचे तसेच पालकांचे नाव उंच करतील अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी काही निवडक देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या बालनाटिका सादर करण्यात आल्या व त्यातून देश प्रेमाची शिकवण दिली .कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बालाजी विश्व विद्यालयाच्या उपमुख्याध्यापका स्वातीच्या चत्तर , प्रणिता शेळके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
सूत्रसंचालन मोनाली अनंतवार ,स्वाती चत्तर , ललिता पोंदे यांनी केले.
प्रणिता शेळके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून,वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.