वार्षिक क्रीडा महोत्सव
बालाजी सेमी इंग्रजी स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव लक्ष्यवेध उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर असलेल्या बालाजी विश्व विद्यालयात लक्ष्यवेध 2024-25 हा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडविले.
यावेळी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव अण्णा पवार, प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती अवॉर्ड विजेते डॉक्टर दिनेश पांडे, इंटरनॅशनल योगा चॅम्पियन श्रेया कंधारे, युनिव्हर्सिटी कबड्डी चॅम्पियन अंकुश इंगवले, विलास सोकाटे डिविजनल हेड स्काऊट अँड गाईड हे लाभले होते .यावेळी विद्यार्थ्यांनी ड्रिल आणि पासिंग आऊट परेड चे उत्तम सादरीकरण केले..प्रमुख पाहुणे, संस्थाध्यक्ष तसेच अन्य मान्यवरानी ओपन जीप मधून परेड चे निरीक्षण केले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करून क्रिडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. मुख्याध्यापक श्री विनायक म्हसवडे यांनी खेळाडूंना क्रीडा प्रतिज्ञा दिली..सरस्वती पूजना बरोबरभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन केले गेले आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ स्पर्धांचे जसे की कबड्डी, खो-खो, लिंबू चमचा, सॅक रेस, थ्री लेग रेस, 100 ,200 मीटर धावण्याची रेस, डॉजबॉल, रिले रेस, गोळा फेक, लांब उडी, लंगडी, इ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
क्रिडा स्पर्धा ही इंटर हाऊस रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस आणि ब्लू हाऊस मध्ये घेण्यात आली..यामध्ये रेड हाऊस ने सर्वाधिक बक्षिसे मिळवत प्रथम क्रमांक पटकावला…
यावेळी चेअरमन सदाशिव अण्णा पवार, इंटरनॅशनल योगा प्लेयर श्रेया कंधारे , पोलीस उपनिरीक्षक श्री दिपक करांडे, तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री दत्तात्रय कापरे, श्री रामचंद्र व्यवहारे, श्री निलेश बांदल, रुपाली आटोळे, गायत्री देव्हाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक श्री विनायक म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपमुख्याध्यापिका सौ स्वाती चत्तर, क्रीडा शिक्षक श्री पोटे , चिकने सर, गवळी सर, जामदार सर, बाबर मॅडम, व्यवहारे , दिवेकर सौजन्य राजवाडे, शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ आदींनी कामगिरी बजावली. अर्चना कड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला
सूत्रसंचालन ललिता पोंदे, यांनी केले.