Balaji Shikshan Prasarak Mandal's School Gallery

Independence Day 15 AUG 2017

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी इंग्लिश मिडिअम स्कूल आणि बालाजी प्राथमिक विद्यालयाने ७१ वा स्वातंत्र्यदिन बालाजी शैक्षणिक संकुल रामलिंग रोड येथे अंत्यत उत्सहात साजरा केला. संमोहन तज्ञ श्री. नवनाथ गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊटगाईड च्या विदयार्थ्यानी उत्कृष्ट परेड सादर करुण ध्वजाला मानवंदना दिली. विशेष उपक्रमाअतर्गत ज्या विदयार्थ्याचे पालक सैन्य दलात आहेत अशा सर्व सैनिक आणि । निवृत्त सैनिकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. सदाशिव पवार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने श्री. नवनाथ गायकवाड आणि अन्य मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. सिंगापुर येथे आंतराष्ट्रीय एशियन योगा चैम्पियनशिप स्पर्धत ( ११ देश आणि २१० खेळाडू ) दोन सुवर्णपदके पटकावून आपल्या देशाची मान उंचावणाऱ्या कु. श्रेया कंधारे हिचा सत्कार संस्थाध्यक्ष मा.श्री सदाशिव पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कु. श्रेया कधारेचे मार्गदर्शक श्री. चंद्रकांत पागारे ( भारतीय योगा संघाचे मार्गदर्शक आणि कप्तान) यांनी विदयार्थ्यशी सुसंवाद साधला आणि योगा विषयी विदयार्थामध्ये आवड निर्माण होईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थानी देशभक्ती पर गीते नृत्ये, कराटे ,तायक्यांदो, किक बॉक्सींग इ. प्रात्यक्षिके सादर केली. समारंभाच्या शेवटी संर्वानी वंदेमात् रम म्हटले त्यानंतर विदयार्थाना लाडू वाटप करण्यात आले.